महायुती धर्मात रावणावरून नवं रामायण, भाजप आणि अमोल मिटकरी आमने-सामने
tv9 Marathi Special Report | रावणदहन प्रथेला अमोल मिटकरी यांचा विरोध. येत्या अधिवेशनात रावणदहन प्रथेवर बंदी घालण्याची मागणी मिटकरींनी केली. त्यावरून भाजपने विरोध दर्शविला आहे. रावण दहनाची प्रथा बंद व्हावी, अमोल मिटकरींची मागणी तर भाजपनं दिलं सडेतोड उत्तर
मुंबई, २७ ऑक्टोबर २०२३ | अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींच्या विधानानंतर महायुती धर्मात रावणावरुन रामायण सुरु होण्याची चिन्हं आहेत. रावण दहनाची प्रथा बंद व्हावी, अशी मागणी अमोल मिटकरींनी केलीय. तर अशी मागणी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देऊ असं भाजपच्या तुषार भोसलेंनी म्हटलंय. रावणदहन प्रथेला अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी विरोध दर्शविलाय. येत्या अधिवेशनात रावणदहन प्रथेवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केलीये. त्यावरून सत्तेतील भाजपने विरोध दर्शविला आहे. विरोधाभास म्हणजे कितीही रावण एकत्र आलेत तरी मोदींना हरवू शकत नाहीत, असं वक्तव्य करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इंडिया आघाडीवर टीका करताय. तर दुसरीकडे त्यांच्या सत्तेतील सहकारी अमोल मिटकरी यांनी रामाबरोबर रावणही आम्हाला वंदनीय असल्याचे म्हटलंय. काही दिवसांपूर्वी राम हा भारतीयांचा मूळ पुरूष असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. यावर अमोल मिटकरी म्हणताय, भारताचे मूळ मालक आदिवासी आहे. त्यांच्यात रावण पूज्यनीय आहे. त्यामुळे रावणदहन अयोग्य आहे.