भाजपनं राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारावर ‘रावण प्रेमी’ म्हणत केली सडकून टीका
VIDEO | आमदार अमोल मिटकरी यांच्या रावणासंदर्भातील वक्तव्यावरून भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. रावणदहन यावर बंदी आणण्याची अमोल मिटकरी यांनी मागणी केली होती. या मागणीवर तुषार भोसले यांचं आक्रमक भाष्य
नाशिक, २५ ऑक्टोबर २०२३ | भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले आमदार अमोल मिटकरी यांच्या रावणासंदर्भातील वक्तव्यावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. रावणदहन यावर बंदी आणण्याची अमोल मिटकरी यांनी मागणी केली होती. अमोल मिटकरी यांच्या या मागणीवर भाष्य करताना तुषार भोसले यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘रावण प्रेमी’ आमदार म्हणत तुषार भोसले यांनी अमोल मिटकरी यांच्यावर सडकून टीका केली आहे. रावण दहनाची प्रथा बंद व्हावी, हा मुद्दा विधानसभेत मांडणार असल्याचे म्हणत यावर शासन निर्णय व्हावा, अशी भूमिका अमोल मिटकरी यांनी मांडली होती. यावर बोलताना तुषार भोसले असेही म्हणाले की, हिवाळी अधिवेशनात जर कुणी हा मुद्दा उपस्थित केला, तर भाजपा आणि शिवसेनेच्या आमदारांकडून अमोल मिटकरी यांना सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशारा देखील भोसले यांनी दिला. दरम्यान, विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी ही तुषार भोसले यांनी केली आहे.