Tushar Bhosale यांचा हल्लाबोल; म्हणाले, ‘शरद पवार अन् उद्धव ठाकरे देशातील सैतानं’

| Updated on: Sep 15, 2023 | 1:55 PM

VIDEO | देशात सनातन विरूद्ध सैतान अशी लढाई आता सुरू असल्याची टीका भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्याकडून करण्यात आली आहे. तर शरद पवार, उद्धव ठाकरे असे देशातील अनेक सैतानं एकत्र आल्याचे म्हणत केला हल्लाबोल

नाशिक, १५ सप्टेंबर २०२३ | देशात सनातन विरूद्ध सैतान अशी लढाई आता सुरू असल्याची टीका भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्याकडून करण्यात आली आहे. पुढे ते असेही म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सनातन धर्माला विशेष गौरव प्राप्त होत असल्याने सोनिया गांधी, स्टॅलिन तर शरद पवार, उद्धव ठाकरे असे देशातील अनेक सैतानं एकत्र आले आहेत आणि देशातील सनातन धर्म संपवण्याचा प्रयत्न करत असून तशी भाषा ते करू लागले आहेत, असे म्हणत तुषार भोसले यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. देशातील जनतेने सजक होऊन या सैतानांचा बंदोबस्त करायचा आहे आणि सनातन धर्माची पताका तेवत ठेवयचा आहे, असा सल्लाही देशातील जनतेला तुषार भोसले यांनी दिला आहे.

Published on: Sep 15, 2023 01:55 PM
Eknath Khadse स्पष्टच म्हणाले, ‘आमदार अपात्रतेची सुनावणी पुढे ढकलणं म्हणजे…’
BEST Bus | शेवटची नॉन एसी डबल डेकर BEST बस घेणार मुंबईकरांचा निरोप