‘माझ्या नादी लागू नका नाहीतर…’, अजित पवार यांना भाजप नेत्यानं दिला थेट इशारा, बघा काय म्हणाले?
VIDEO | 'बारामतीच्या बाहेरच किती कळतं माहिती नाही मात्र त्यांनी माझ्या नादाला लागू नका नाहीतर...', भाजप नेत्याचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल
मुंबई : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीसाठी उद्या, रविवारी मतदान होत आहे. अशातच कसबा पोटनिवडणुकीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं नारायण राणे आणि अजित पवार यांच्या दोघातील वाद चांगलाच शिगेला पोहचला आहे. काल अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका करताना म्हटले की, एकदा कोकणात तर आणि एकदा मुंबईतून नारायण राणे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांचा हा पराभव एका महिलेनं केला आहे, असे म्हणत नारायण राणे यांना टोला लगावला. यावर आज नारायण राणे यांनी प्रत्युत्तर देताना थेट इशाराच दिला आहे. काय दिला नारायण राणे यांनी अजित पवार यांना इशारा बघा व्हिडीओ…
Published on: Feb 25, 2023 06:42 PM