उद्धव ठाकरे यांनी खोक्याचे व्यवहार केले आणि…, नारायण राणे यांनी काय केला गौप्यस्फोट?
VIDEO | ठाकरे यांचे १५ आमदार तरी राहतील का? नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
नाशिक : शिवसेना सोडलेले सगळे संपतील पण शिवसेना संपणार नाही, असा दावा ठाकरे गटातील नेत्यांकडून करण्यात येत आहे. यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दावा सगळेच करतात मात्र हा दावा जनतेने करायला हवा, स्वतः दावा करून फायदा नाही, असा खोचक टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे काय राहिले आहे का, १५ आमदार शिल्लक आहे ते निवडणुकीपर्यंत राहतील का? असा सवालही नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांच्याकडे काय राहिल आहे का? कसलंच अस्तित्व नाही, काही नाही. गेलेले लोक काय म्हणतात आपल्याबद्दल ते पहा. अडीच वर्षात आपण काय केलं ते पहा म्हणावं, असे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
Published on: Feb 25, 2023 06:24 PM