हिंदुत्ववादी भूमिका सोडून काँग्रेसची भूमिका स्वीकारली, उद्धव ठाकरेंवर घणाघात

| Updated on: Mar 25, 2023 | 7:53 PM

VIDEO | जाणीवपूर्वक अशी कारवाई करता येत नाही, राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईवरून भाजप नेत्यानं नेमकं काय सांगितलं?

सिंधुदुर्ग : भाजपचे नेते विनोद तावडे यांनी काँग्रेसबरोबरच महाविकास आघाडीवरही निशाणा साधला आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून त्यांनी महाविकास आघाडीला छेडले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या पहाटेच्या शपथविधी नंतर जर सरकार स्थापन झालं असतं तर आम्ही राष्ट्रवादीला आमच्या भूमिकेवर आणलं असतं. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादीची भूमिका सोडून काँग्रेसची भूमिका स्वीकारली. सरकार बनल्यानंतर आपल्या अजेंड्यावर सहकाऱ्यांना आणण महत्वाचं असतं मात्र खुर्चीसाठी फरफटत जाण चांगलं नसतं असा टोला विनोद तावडे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना विनोद तावडे म्हणाले, राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला असून राहुल गांधी यांना ते शोभणारं आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Published on: Mar 25, 2023 07:53 PM
माझ्यावरील संस्कार गुडघे टेकण्याचे नाहीत, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
डोळा, लोटा अन्… अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची तुफान टोलेबाजी