Special Report | नारायण राणे, चंद्रकांत पाटलांच्या टार्गेटवर संजय राऊत!

Special Report | नारायण राणे, चंद्रकांत पाटलांच्या टार्गेटवर ‘संजय राऊत’!

| Updated on: Nov 05, 2021 | 9:45 PM

सुमारे अर्धा तास चाललेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तुफान बॅटिंग करत दादरा नगर हवेली, इंधन दरकपात, बारामतीमधला पवार-ठाकरेंचा कार्यक्रम, ईडी सीबीआयच्या धाडी आदी विषयांवर त्यांनी फटकेबाजी केली. तर राऊतांवर टीका करताना मात्र त्यांनी हात आखडता घेतला नाही.

मुंबई : रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने संजय राऊतांना भान राहत नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. संजय राऊत काहीतरी हवेतली विधाने करतं. हास्यास्पद दावे करतात, काहीही अग्रलेख लिहितात. मला वाटतं रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही, असं नारायण राणे म्हणाले. नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पवार ठाकरेंवर जोरदार आसूड ओढले. सुमारे अर्धा तास चाललेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तुफान बॅटिंग करत दादरा नगर हवेली, इंधन दरकपात, बारामतीमधला पवार-ठाकरेंचा कार्यक्रम, ईडी सीबीआयच्या धाडी आदी विषयांवर त्यांनी फटकेबाजी केली. तर राऊतांवर टीका करताना मात्र त्यांनी हात आखडता घेतला नाही.

Special Report | पाडव्याला नारायण राणे V/s उद्धव ठाकरे
Special Report | NCB च्या समीर वानखेडेंवर मोठी कारवाई!