Special Report | नवाब मलिकांवर पहिला बार फुटला… अधिवेशनात काय?
मलिक यांनी 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाह वली खान आणि सलीम पटेल यांच्याकडून कवडीमोल दराने जवळपास 3 एकर जमीन विकत घेतल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय.
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर जमीन खरेदी गैरव्यवहाराचा एक गंभीर आरोप केलाय. मलिक यांनी 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाह वली खान आणि सलीम पटेल यांच्याकडून कवडीमोल दराने जवळपास 3 एकर जमीन विकत घेतल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या या आरोपांना आता मलिक यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीसांचा बॉम्ब तर फुटला नाही, पण आम्ही उद्या सकाळी 10 वाजता हायड्रोजन बॉम्ब फोडणार असा दावाच मलिक यांनी केलाय.