विनायक राऊत हा निष्क्रिय खासदार, कुणी केला थेट हल्लाबोल?
VIDEO | रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमधील निष्क्रिय खासदार आम्हाला बदलायचा आहे, महायुतीचा खासदार हवा आहे त्यामुळे आम्ही खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे वक्तव्य करत भाजपचे लोकसभा संयोजक प्रमोद जठार यांनी यांनी विनायक राऊत यांच्यावर खोचक टीका केली.
रत्नागिरी, १५ ऑक्टोबर २०२३ | रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीची कोर कमिटी जो उमेदवार ठरवतील, त्या उमेदवारासाठी आम्ही सर्व मंडळी काम करू, असे भाष्य भाजपचे लोकसभा संयोजक प्रमोद जठार यांनी केले आहे. तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमधील निष्क्रिय खासदार आम्हाला बदलायचा आहे, अशी खोचक टीका करून महायुतीचा खासदार हवा आहे त्यामुळे आम्ही खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे वक्तव्य प्रमोद जठार यांनी केले. तर मुंबई गोवा महामार्ग रखडला याला कारणीभूत इथला निष्क्रिय खासदार विनायक राऊत असल्याचे म्हणत विनायक राऊत यांच्यावर जठार यांनी थेट हल्लाबोल केलाय. पुढे ते असेही म्हणाले की, आपल्या मुलाला टोलचं कंत्राट कसं मिळेल याच्यामागे ही मंडळी आहेत. विक्रमादित्यांच सिंहासन आहे जो बसेल तो राजा होईल, असे म्हणत लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून प्रमोद जठार यांनी हे सूचक विधान केले आहे.