Maharashtra Cabinet Expansion : महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?

| Updated on: Dec 16, 2024 | 12:09 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. भाजपच्या सर्वाधिक 19 मंत्र्यांनी शपथ घेतली, तर शिवसेना शिंदे गटाच्या 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. नव्या सरकारच्या एकूण 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. भाजपच्या सर्वाधिक १९ मंत्र्यांनी शपथ घेतली, तर शिवसेना शिंदे गटाच्या ११ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. नव्या सरकारच्या एकूण ३९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.  साताऱ्यात सर्वाधिक म्हणजेच चार कॅबिनेट मंत्रिपदं मिळाली आहे. यामध्ये भाजपला २, शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी १-१ अशी मंत्रिपदं मिळाली आहेत. भाजपकडून साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले, भाजप माण-खटाव येथून जयकुमार गोरे, शिंदेंच्या शिवसेनेतून पाटणचे शंभूराज देसाई आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे वाईचे मकरंद पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पुणे जिल्ह्याला ३ कॅबिनेट तर १ राज्यमंत्रिपद मिळालंय. बारातीतून अजित पवार, दत्तात्रय भरणे, चंद्रकांत पाटील आणि माधुरी मिसाळ यांनी मंत्रिपदाची शपथ ग्रहण केली. तर नाशिकमधून तीन जणांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे. मालेगाव येथून शिंदेंचे मंत्री दादा भुसे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील सिन्नरचे माणिकराव कोकाटे आणि दिंडोरीतून नरहरी झिरवळ यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. जळगावातील तीन कॅबिनेट मंत्री नव्या सरकारमध्येही कायम राहिलेत यामध्ये भाजपचे गिरीश महाजन, संजय सावकारे तर शिंदेंच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील कॅबिनेट मंत्री झालेत. रायगड जिल्ह्याला अदिती तटकरे आणि भरत गोगावले हे दोन कॅबिनेट मंत्री लाभलेत.

Published on: Dec 16, 2024 11:30 AM
Ajit Pawar : अजित पवारांनी आपल्याच मंत्र्यांना इशारा देत टोचले कान, ‘… अन्यथा वेगळा निर्णय घेण्यात येईल’
Zakir Hussain passes Away : प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन