WITT Global Summit : उद्धव ठाकरे यांना भाजपात घेणार? अमित शाह यांचं एका वाक्यात म्हणाले…यायचं असेल तर…

| Updated on: Feb 28, 2024 | 10:41 AM

TV9 च्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या विशेष कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना भाजप सोबत घेणार का? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी विचारण्यात आला. या प्रश्नावर अमित शाह यांनी स्पष्टच उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. मला तुमचीही गरज आहे. तुम्ही....

Follow us on

नवी दिल्ली, २८ फेब्रुवारी २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणितं बदलताना दिसताय. भाजप आणि शिवसेना एकत्र आहेत मात्र ठाकरे एकाकी पडलेत तर नुकतीच राष्ट्रवादी अजित पवार यांनी साथ दिली आहे. अशातच TV9 च्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या विशेष कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना भाजप सोबत घेणार का? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी विचारण्यात आला. या प्रश्नावर अमित शाह यांनी स्पष्टच उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. ‘मला तुमचीही गरज आहे. तुम्ही ज्वाईन करा. आमचा पक्ष परिवार नियोजन मानते. पक्षातील कार्यकर्त्याचं परिवार नियोजन मानत नाही. भाजपच्या अजेंड्याशी जे सहमत आहेत त्या सर्वांचं भाजपात स्वागत आहे. आमच्या अजेंड्यावर चालायचं आहे फक्त असं अमित शाह म्हणाले. यावेळी त्यांना नितीश कुमार यांना आणि उद्धव ठाकरे यांन सोबत घेण्याबाबत विचारण्यात आल होतं. तुम्ही राँग नंबरवर प्रश्न करत आहात. तुम्ही नितीश कुमार यांना विचारा. आमचा पक्ष फर्म आहे. आमच्या पक्षाचा अजेंडा ज्यांना मान्य आहे, मोदींचा विश्वास ज्यांच्यावर आहे त्यांनी आमच्यासोबत यावं, असे त्यांनी म्हटले.