शिंदेंचे आमदार अपात्र झाले तरी फरक पडत नाही, भाजप मंत्र्याचं भुवया उंचावणारं वक्तव्य अन् उडाली खळबळ
शिवसेना अपात्र आमदार प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या निकाल देणार आहे. या निकालाने सरकार राहणार की कोसळणार याचा फैसला होणार आहे. या निकालापूर्वी राजकीय वर्तुळातून विविध राजकीय नेते आपापले अंदाज बांधताना दिसताय. अशातच भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी भुवया उंचावणारं वक्तव्य केले
नाशिक, ९ जानेवारी २०२४ : शिवसेना अपात्र आमदार प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या निकाल देणार आहे. या निकालाने सरकार राहणार की कोसळणार याचा फैसला होणार आहे. या निकालापूर्वी राजकीय वर्तुळातून विविध राजकीय नेते आपापले अंदाज बांधताना दिसताय. अशातच भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी भुवया उंचावणारं वक्तव्य केले आहे. गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र झाले तरी सरकारला फरक पडणार नाही, अजित पवार यांचे आमदार सरकारसोबत आहेत. विधानसभा अध्यक्ष निकाल देतील, तो सर्वांना मान्य करावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी यांनी दिली आहे. त्यामुळे उद्या येणाऱ्या निकालच्या पूर्वसंध्येला सर्वांच्या नजरा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे लागल्या आहेत.