निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही?, उदय सामंत यांना सवाल करताच ते…; महायुतीत काय घडतंय?
भाजप खासदार नारायण राणे यांचं सुपुत्र माजी खासदार निलेश राणे लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असताना महायुतीतील मंत्र्यांना निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? असा सवाल करण्यात आला यावेळी काय म्हणाले ते बघा?
भाजप खासदार नारायण राणे यांचं सुपुत्र माजी खासदार निलेश राणे लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तर गेल्या आठवड्यातच नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. यावेळी झालेल्या भेटीत कुडाळ विधानसभा मतदारसंघावर नारायण राणे कुटुंबीयांनी दावा केल्याचे सांगितले जात होते. अशातच निलेश राणे शिंदे गटातून लढतील का? असा सवाल महायुतीतील मंत्र्यांना करण्यात आला. नारायण राणे यांचं सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांच्यावरील प्रश्नावर भाजप मंत्री रविंद्र चव्हाण आणि शिवसेना मंत्री उदय सामंत यांनी उत्तर देणं टाळल्याचे पाहायला मिळाले. निलेश राणे हे शिंदे गटातून लढतील का? असा प्रश्न रविंद्र चव्हाण आणि उदय सामंत दोघे सोबत असताना माध्यमांच्या प्रतिनिधींकडून विचारण्यात आला होता. मात्र या प्रश्नावर उत्तर देणं रविंद्र चव्हाण आणि उदय सामंत या दोघांनी टाळल्याचे पाहायला मिळाले. निलेश राणे हे शिवसेनेतून लढतील अशी चर्चा आहे, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी करताच रविंद्र चव्हाण यांनी एका शब्दात उत्तर दिलं त्यांनी धन्यवाद म्हटलं आणि अधिक यावर बोलणं टाळंल. तर उदय सामंत यांना विचारलं असता, मी काय सांगू असता असं म्हणत रविंद्र चव्हाण यांनी उदय सामंत यांनी बाहेर नेल्याचे पाहायला मिळाले.