मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या केंद्रीय योजनेची लाभार्थी, केंद्राकडून ‘इतक्या’ कोटींचं अनुदान; काँग्रेसचा आरोप काय?

| Updated on: Sep 15, 2023 | 12:20 PM

VIDEO | भाजपचे मंत्री विजय कुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित यांनाच सरकारी योजनेत केंद्रानं दिलं १० कोटीं रूपयांचं अनुदान, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि सचिन सावंत यांनी काय केला आरोप?

मुंबई, १५ सप्टेंबर २०२३ | मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या केंद्रीय योजनेची लाभार्थी असून सुप्रिया गावित यांना १० कोटी रूपयांचे अनुदान दिल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि सचिन सावंत यांनी ट्वीटकरून मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘योजना शेतकऱ्यांची लाभार्थी यादी भाजप मंत्र्यांची…किसान संपदा योजनेअंतर्गत केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने कृषी प्रक्रिया क्लस्टर प्रकल्पांना सबसिडी दिली आहे. ह्यात मुख्य लाभार्थी आहे ते भाजप नेते आणि मंत्री विजय गावित यांची मुलगी’, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला आहे. तर ‘सरकारने जनतेसाठी काम करायचे असते, भाजपचे मंत्री आणि त्यांच्या मुलांसाठी नाही, हा भाजपाचा ‘परिवारवाद’ नव्हे का?’, असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.

Published on: Sep 15, 2023 12:20 PM
मुख्यमंत्र्यांप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शासकीय विमान वापरता येणार, काय आहे सुधारीत नियम?
Weather Update | मुंबई आणि शेजारील जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस? हवामान खात्याचा अंदाज काय?