‘कॅग ऑडिटमुळे खरा चोर कळाला, मुंबईचा कोपरा न् कोपरा विकून खाल्ला’, भाजपचा हल्लाबोल

| Updated on: Mar 25, 2023 | 4:42 PM

VIDEO | मुंबई महापालिकेतील कारभाराची चौकशी करणारा कॅगचा अहवाल आज विधिमंडळात सादर, अहवालात पालिकेच्या कारभारावर भाजपनं ओढले ताशेरे

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात कॅगचा अहवाल सादर केला. मुंबई महापालिकेत तब्बल १२ हजार कोटी रुपयांच्या कामाचे कॅगकडून ऑडिट करण्यात आले आहे. विशेषतः कोरोना काळातील निधीचा गैरवापर करण्यात आल्याचा ठपका या अहवालातून ठेवण्यात आला आहे. इतकेच नाही तर अहवालात पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. त्यामुळे भाजप आमदारांनी आता ठाकरे गटावर गंभीर आरोप करायला सुरुवात केली आहे. या देशात चोराला चोर म्हणणं गुन्हा आहे, असं काल कुणीतरी म्हणालं होतं. पण कॅग अहवालाच्या माध्यमातून मुंबईचा खरा चोर, डाकू, खरा लुटणारा कोण आहे हे कळालं. मुंबईचा कोपरा न् कोपरा विकून खाल्ला, यांना चोर नाही डाकू म्हणावं, अशी टीका भाजप आमदार अमित साटम यांनी केली आहे.

Published on: Mar 25, 2023 04:38 PM
उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या सल्ल्यानं नवा पक्ष स्थापन करावा, कुणी दिला खोचक सल्ला
उद्धव ठाकरे यांची मालेगावात जाहीर सभा, उर्दू भाषेत केली बॅनरबाजी अन् राजकीय वर्तुळात चर्चा