Special Report | EDच्या रडारवर आलेलं Sanjay Raut यांचं जमीन प्रकरण काय ? -tv9

| Updated on: Feb 09, 2022 | 8:54 PM

आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही. तुमची दादागिरी खपवून घेणार नाही. याद राखा, मुंबईत शिवसेनाच दादा आहे. आम्हीच मुंबईत दादागिरी करणार आहोत’, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींना पत्र लिहित लेटर बॉम्ब टाकला. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत राऊतांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय. ‘केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत. बदनाम करण्याचं काम सुरू आहे. ते भ्रमात आहेत. पण आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही. तुमची दादागिरी खपवून घेणार नाही. याद राखा, मुंबईत शिवसेनाच दादा आहे. आम्हीच मुंबईत दादागिरी करणार आहोत’, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. इतकंच नाही तर ‘हे सरकार पडणार नाही. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या कुटुंबालाही भयंकर त्रास देत आहेत. खोटे पुरावे निर्माण करतात. रोज सकाळी एक माणूस उठतो आणि बेवड्यासारखा बडबडतो. मी मागेही म्हणालो, आम्ही तुमच्या घरात घुसलो, तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही,’ असंही राऊत म्हणाले. संजय राऊतांच्या या इशाऱ्याला आता भाजप आमदार अमित साटम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

जेष्ठ समाजसेवक Anna Hazare राज्य सरकारविरोधात बसणार आमरण उपोषणाला
भाजपला पाचही राज्यात मोठा विजय मिळेल – PM Narendra Modi | PM Narendra Modi Interview |