भाजप आमदार Amit Satam यांचं Kishori Pednekar यांना थेट आव्हान
मी आपणास जाहीर आव्हान देतो की, तुम्ही माझे खरे अनुमोदनाचे पत्र सात दिवसांच्या आत महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करून दाखवावे.
मुंबई : मुंबईला तुंबई करणाऱ्या व टिपू सुलतानाच्या नामकरणाच्या समर्थनाार्थ खोटं बोलणाऱ्या महापौरांचा मी निषेध करतो. आपली सुलतानवरची ‘श्रद्धा झाकण्याकरीता आपण हिंदु ह्दयसम्राट यांच्या नावाचाही आडोसा घेताय व माझे नाव सुद्धा बनावट पद्धतीने टिपू सुलतान रस्ता नामकरण प्रकरणात गोवत आहात. ही दयनीय अवस्था आज सोनिया सेनेची झालेली आहे. याचं मला दुख आहे. मी आपणास जाहीर आव्हान देतो की, तुम्ही माझे खरे अनुमोदनाचे पत्र सात दिवसांच्या आत महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करून दाखवावे. अन्यथा तुम्ही बनावट पद्धतीने जे माझे नाव गोवले आहे, या विरोधात मी पोलीसात रितसर तक्रार करून तुमच्यावर 50 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे, असे आव्हान भाजप आमदार अमित साटम यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना केले आहे.