उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या सल्ल्यानं नवा पक्ष स्थापन करावा, कुणी दिला खोचक सल्ला
VIDEO | भाजप नेत्यानं म्हणीचा दाखला देत केली उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका, बघा व्हिडीओ
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यात हिंमत असेल तर वेगळा पक्ष काढून दाखवावा आणि ५ आमदार तरी निवडून आणावे. यासह उद्धव ठाकरे यांना शिंदे-फडणीवस सरकार घाबरतं म्हणून देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्यावर सतत टीका करतात, अशी टीका ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे आणि भाजपवर करण्यात येत आहे. या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे खूप लोकप्रिय आहेत, असे वाटते ना… आताच दोन पोटनिवडणुका झाल्यात एकाही ठिकाणी निवडणूक लढवायला मिळाली नाही. यांना मुंबई महापालिकेत आणि महाराष्ट्रातही किंमत नाही. यांचा पक्ष राहिला नाही, असे म्हणत अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला तर एवढे ताकदवान आणि लोकप्रिय आहेत तर शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार नवीन पक्ष स्थापन करावा असा खोचक सल्लाही त्यांनी लगावला आहे.
Published on: Mar 25, 2023 04:09 PM