Devayani Farande : सकाळी उठून भांग घेणाऱ्या संजय राऊत यांची नार्को टेस्ट करा, ‘या’ महिला आमदाराची मागणी

| Updated on: Oct 20, 2023 | 6:10 PM

VIDEO | संजय राऊत ज्या पद्धतीने बेताल वक्तव्य करत आहे. ललित पाटील आणि ड्रग्स प्रकरणात उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट राजकारण करत असल्याचे म्हणत संजय राऊत मनोरूग्ण झाले आहेत किंवा तेच ड्रग्ज घेत आहेत, असे वक्तव्य भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी केले आहे. बघा संजय राऊत यांच्या आरोपावर काय म्हणाल्या

नाशिक, २० ऑक्टोबर २०२३ | नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे हे विधानसभेपर्यंत असल्याच्या आरोपासह नाशिकच्या आमदारांचे कनेक्शन देखील या प्रकरणाशी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर बोलताना भाजप आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या, संजय राऊत मनोरूग्ण झाले आहेत किंवा तेच ड्रग्ज घेत आहेत, असे मला वाटते. राज्यातील ड्रग्ज कारखाने उघडकीस आणण्याचे काम राज्य सरकार करत आहे. पोलिस देखील राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा तपास करत आहे. असे असताना संजय राऊत ज्या पद्धतीने बेताल वक्तव्य करत आहे. ललित पाटील आणि ड्रग्स प्रकरणात उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट राजकारण करत आहे, असे देवयानी फरांदे म्हणाल्या. तर ललित पाटील यांच्याकडून हप्ता बंद झाला का, असा सवालही देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला आहे. ड्रग्ज प्रकरणात ठाकरे गटाने बेछुट आरोप करु नयेत. यापूर्वी ठाकरे गटाने मोर्चा का काढला नाही. याविषयी चौकशी का झाली नाही, असा आक्रमक सवाल करत संजय राऊत यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी फरांदे यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

Published on: Oct 20, 2023 06:10 PM
Sharad Koli : चिंधी चोर म्हणत नितेश राणे यांची कुणी काढली अक्कल?
MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाला सुनावले खडेबोल अन् घेतला मोठा निर्णय