गणपत गायकवाड यांच्या पत्नीची राजकारणात एन्ट्री, थेट विधानसभा लढवणार?

| Updated on: Mar 12, 2024 | 12:49 PM

गोळीबार प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांच्या पत्नी राजकारणात आल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. एका राजकीय कार्यक्रमाच्या व्यासपीठावर गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी हजेरी लावल्याने चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे

कल्याण, १२ मार्च २०२४ : गोळीबार प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांच्या पत्नी राजकारणात आल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. एका राजकीय कार्यक्रमाच्या व्यासपीठावर गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी हजेरी लावल्याने चर्चांना उधाण आले आहे. इतकंच नाहीतर सुलभा गायकवाड या विधानसभा निवडणूक लढवणार का? अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात. शिंदे गटाचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या चिंचपाडा परिसरातील जनसंपर्क कार्यालयाबाहेर विकास कामाचे भूमीपूजन करत सुलभाताई गायकवाड यांनी शक्ती प्रदर्शन केले. दरम्यान, उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात शिवसेना पदाधिकारी महेश गायकवाड याच्यावर गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणातील आरोपी त्यांचा मुलगा वैभव गायकवाड फरार आहे.

Published on: Mar 12, 2024 12:49 PM
वन्यजीव विभागाचं ठरलं ! नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नवे 3 पाहुणे येणार
विठू माऊलीच्या भक्तांसाठी मोठी बातमी, पंढरपूरचं विठ्ठल मंदिर दीड महिना बंद, काय कारण?