Uddhav Thackeray यांच्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता नाही, Girish Vyas यांचा आरोप
उद्धव ठाकरे यांच्यात गुणवत्ता नाही. महाराष्ट्रंही नीट सांभाळता येत नाही, मग देशाचं नेतृत्व करण्याचं स्वप्न पाहू नये, असंही भाजप प्रवक्ते आ. गिरीश व्यास म्हणाले.
नागपूर : उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याचीही क्षमता नाही, महाराष्ट्राच्या सीम माहित नसलेले उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्त्व कसं करणार? असा सवाल उपस्थित करत भाजप प्रवक्ते आ. गिरीश व्यास यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवलीय. उद्धव ठाकरेंमध्ये देशाचं नेतृत्त्व करणाची क्षमता आहे, हे संजय राऊत यांचं वक्तव्य आपल्या नेत्याला खूश करण्यासाठी आहे. उद्धव ठाकरे यांच्यात गुणवत्ता नाही. महाराष्ट्रंही नीट सांभाळता येत नाही, मग देशाचं नेतृत्व करण्याचं स्वप्न पाहू नये, असंही भाजप प्रवक्ते आ. गिरीश व्यास म्हणाले.