गोपीचंद पडळकर पुन्हा शरद पवार यांच्यावर घसरले, आपल्याच सरकारला काय दिला अल्टिमेटम
tv9 Marathi Special report | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा पुन्हा शरद पवार यांच्यावर हल्लोबाल, डोक्यावर पिवळा फेटा बांधत आणि हातात कुऱ्हाड घेऊन गोपीचंद पडळकर सांगलीतील आरेवाडी येथील व्यासपीठावर आले आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. बघा काय केली सडकून टीका
मुंबई, २३ ऑक्टोबर २०२३ | धनगर समाजाच्या आरक्षणावरून आमदार गोपिचंद पडळकर यांनी आपल्याच समाजाला अल्टिमेटम दिलाय आणि त्यांनी पुन्हा शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. सांगलीच्या दसरा मेळाव्यामध्ये त्यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून पवारांवर सडकून टीका केली. सांगलीतील आरेवाडी येथून गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला. डोक्यावर पिवळा फेटा बांधत आणि हातात कुऱ्हाड घेऊन पडळकर व्यासपीठा आले आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. काही दाखले देत शरद पवार यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पहिला विरोध केला असल्याचा आरोप पडळकरांनी केला. इतकंच नाहीतर पुतण्या फुटला म्हणून माळी समाजाच्या भुजबळांना टार्गेट केलं जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर धनगर समाजाच्या आरक्षणावर पडळकरांनी आपल्याच सरकारला अल्टिमेटम दिलाय. बघा स्पेशल रिपोर्ट