Video | सरकारमुळे राज्यात जातीय तेढ निर्माण झाल्याचं वातावरण : गोपीचंद पडळकर
महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जातीय तेढ कशी निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे निर्माण झालं आहे. मागच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. ते सुप्रीम कोर्टात व्यवस्थित बाजू न मांडल्यामुळे रद्द झालं, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
मुंबई : महाविकास आघाडी सरकारवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी सडकडून टीका केली आहे. महाराष्ट्र सर्व समूहांसोबत राहणारे राज्य आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जातीय तेढ कशी निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे निर्माण झालं आहे. मागच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. ते सुप्रीम कोर्टात व्यवस्थित बाजू न मांडल्यामुळे रद्द झालं, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.