रोहित पवार बिनडोक, त्यांना सल्ला देणारे बेक्कल; भाजप आमदारानं थेट अक्कलच काढली
राज्यात रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेला कुठेच रिस्पॉन्स मिळाला नाही. संघर्ष यात्रा अयशस्वी झाली म्हणून काहीतरी स्टंट करायचा. यात्रा अपयशी ठरली त्यामुळे रोहित पवार यांनी हा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचेही पडळकर म्हणाले.
नागपूर, १३ डिसेंबर २०२३ : रोहित पवार बिनडोक माणूस आहे. तर रोहित पवार यांना सल्ला देणारा देखील बेअक्कल असल्याचे म्हणत भाजप नेते आमदारानं जोरदार रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर रोहित पवार आणि संघर्षाचा काय संबंध? असा सवाल करत भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांची अक्कलच काढल्याचे पाहायला मिळाले. आमदार रोहित पवार यांची यात्रा अपयशी झाली म्हणून हा स्टंट असल्याचे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी खोचक टीकाही केली. नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशन विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पडळकर यांनी ही सडकून टीका केली आहे. तर राज्यात रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेला कुठेच रिस्पॉन्स मिळाला नाही. संघर्ष यात्रा अयशस्वी झाली म्हणून काहीतरी स्टंट करायचा. यात्रा अपयशी ठरली त्यामुळे रोहित पवार यांनी हा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचेही पडळकर म्हणाले.