रामाचं अस्तित्व कुठे? विचारण्यांवर स्वत:चं अस्तित्व शोधण्याची वेळ, कुणी डागली शरद पवारांवर तोफ?

| Updated on: Feb 09, 2024 | 5:07 PM

'ज्या पद्धतीने तुम्ही पेराल त्या पद्धतीने ते उगवत राहतं. पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. आजोबानी केलं तर वडिलाला, वडिलानं केलं तर नातवाला फेडायला लागायचं पण आता परिस्थिती बदलली आहे. दहा ते १५ वर्षांनी हा बदल होतोय. शरद पवार यांनी पहिलेपासून फोडाफोडीचं राजकारण केलं'

पंढरपूर, ९ फेब्रुवारी २०२४ : जे पेरले तेच उगवले, असे म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचेवर तुफान टोलेबाजी केली आहे. ते म्हणाले, ज्या पद्धतीने तुम्ही पेराल त्या पद्धतीने ते उगवत राहतं. पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. आजोबानी केलं तर वडिलाला, वडिलानं केलं तर नातवाला फेडायला लागायचं पण आता परिस्थिती बदलली आहे. दहा ते १५ वर्षांनी हा बदल होतोय. शरद पवार यांनी पहिलेपासून फोडाफोडीचं राजकारण केलं. त्यांचं राजकारण वैचारिक स्तरावरचं नव्हतं. काही लोकं एकत्रित करायचे, गट तयार करायचे आणि त्याला पक्षाचं नाव द्यायचं असा प्रकार शरद पवार यांचा होता, असे म्हणत जोरदार हल्लाबोल पडळकर यांनी पवारांवर केला तर २०१९ ला भाजपचा मोठा विश्वास घात केला. त्यांनी असुरी आनंद व्यक्त केला. आणि अडीच वर्ष त्यांनी तसं कामही केलं. शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली. महाराष्ट्रात पवार यांनी घरे फोडली त्याचे फळ आज मिळते आहे. जे रामाचे अस्तित्व कुठे विचारात होते त्यांना आता त्यांचे अस्तित्व शोधण्याची वेळ आली, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी खोचक टीकाही केली आहे.

Published on: Feb 09, 2024 05:07 PM
डायनॅमिक मुख्यमंत्री… पंतप्रधान मोदी यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या भन्नाट शुभेच्छा
अरे देवा! चंद्रकांत पाटील म्हणताय महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे!