गोपीचंद पडळकर भडकले, जितेंद्र आव्हाड यांना नको ते बोलून बसले, हा तर ‘जितुद्दीन’
भाजपच्या फायरब्रँड गोपीचंद पडळकर या नेत्याची शरद पवार, अजित पवार यांच्यासह जितेंद्र आव्हाड यांच्यावर जहरी टीका
सोलापूर : ‘शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या माध्यमातून बोलत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर शरद पवार समशुद्दीन, अजित पवार अझरुद्दीन आणि जितेंद्र आव्हाड जितुद्दीन झाले असते’, असे म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यासह अजित पवार आणि जितेंद्र आव्हाडांवर जोरदार निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या छत्रपती शिवरायांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून नेहमीच शरद पवार बोलत आहेत. जे त्यांना बोलता येत नाही ते जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून ते बोलत आहेत. पण आव्हाडांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार मताच्या राजकारणासाठी गरळ ओकण्याचे काम जितेंद्र आव्हाड करताय. जर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर हे आव्हाड जितुद्दीन झाले असते, अजित पवार हे अजदुद्दीन आणि शरद पवार हे समशुद्दीन झाले असते, असे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे.