Gopichand Padalkar | वळसे पाटील आपण सावधान रहा – पडळकरांचा पाटलांना खोचक सल्ला
राष्ट्रवादी हा पक्ष जादा दिवस टिकणारा पक्ष नाही, हा पक्ष कधीही विसर्जित होऊ शकतो, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती.
भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांसह पक्षावर चांगलाच निशाणा साधला आहे. त्यांनी गृहमंत्री वळसे पाटील यांनाही खोचक सल्ला दिला. पुणे येथील वेल्हे याठिकाणी भाजप मेळाव्यात बोलत असताना पडळकरांनी ही टीका केली.
महाराष्ट्रात महाआघाडीचं सरकार स्थापन झालं आणि शरद पवारांनी (Sharad Pawar) पुतण्याला उपमुख्यमंत्री केलं. राष्ट्रवादीला नेहमी सत्तेत गृह मंत्रालय पाहिजे असतं. मग पवारांनी अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) शोधलं, त्यांचं कधी नाव ऐकलं होतं का? असा खोचक सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला होता.
शरद पवारांना असा गृहमंत्री पाहिजे की जो पैसे गोळा करेल आणी पोटात राहील, रोज नोटा बारामतीला पोहोच करेल असा गृहमंत्री ते शोधतात. म्हणून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आपण सावधान राहा, असा सल्लाही गोपीचंद पडळकर यांनी गृहमंत्री वळसे पाटलांना दिला.