मराठा आरक्षणासाठी ‘या’ भाजप आमदारानं सोडलं पद अन् दिला राजीनामा
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी विधानसभा अध्यक्षांकडे पहिल्या भाजप आमदारानं राजीनामा दिला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई येथील या भाजप आमदाराचं नाव लक्ष्मण पवार असं असून त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
बीड, ३० सप्टेंबर २०२३ | हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या पदाचा काल राजीनामा दिला होता. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आमदारांना राजीनामा न देण्याचे आवाहनही केले होते. मात्र तरीही आमदारांच्या राजीनाम्याची मालिका सुरूच आहे. त्यातच आता मराठा आरक्षणासाठी भाजपच्या पहिल्या आमदारानं आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई येथील या भाजप आमदाराचं नाव लक्ष्मण पवार असं असून त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याविषयावर समाजाच्या भावना तीव्र आहेत. मी मराठा आरक्षणासाठी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. असे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटलं आहे.
Published on: Oct 30, 2023 05:26 PM