‘शिंदेंच्या मनात होतो, कारण मीही दाढीवाला’, भाजप आमदाराची तुफान टोलेबाजी
2014 ला एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारी मागण्यासाठी गेल्याचा सांगितला किस्सा अन् व्यासपीठावर एकच हस्यकल्लोळ झाला
भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्टाईलचं तोंडभरून कौतुक केले आहे. यासह संवेदनशील आणि भावनिक हे राज्याचे मुख्यमंत्री असल्याचेही त्यांनी म्हटले. महेश लांडगे हे 2014 ला एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारी मागण्यासाठी गेले होते, तेव्हा किस्सा देखील त्यांनी आपल्या भाषणातून सांगितला. 2014 ला एकनाथ शिंदे यांच्याकडे मी उमेदवारी मागण्यासाठी गेलो आणि त्यांना सांगितले मला आपल्याकडून उमेदवारी हवी आहे. त्यावेळी मी एकनाथ शिंदे यांच्या मनात होतो, कारण मीही दाढीवाला आहे. पुढे त्यांनी शिंदे सरकारचं कौतुक करताना असेही म्हटले की, महाराष्ट्रावर कितीही मोठं संकट आलं तरी त्याच्यावर मात करण्याची ताकद असणारं सरकार सध्या सत्तेत आहे.
Published on: Jan 30, 2023 10:57 AM