ठाकरेंना आदूची, पवारांना तोईची काळजी पण पतंप्रधान मोदींना…. भाजप आमदारानं डिवचलं

| Updated on: Apr 15, 2024 | 1:27 PM

65 वर्ष जे देशाला काही देऊ शकले नाही ते लोक आता सांगताय आम्ही देशाला न्याय देऊ. आशेचं रूपांतर आता निराशेमध्ये झालं आहे, राहुल बाबाला आता अर्थ नाही, असे म्हणत मंगेश चव्हाण यांनी काँग्रेस आणि राहुल गांधीवर निशाणा साधला आहे.

महायुतीच्या मेळाव्यातून भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. 65 वर्ष जे देशाला काही देऊ शकले नाही ते लोक आता सांगताय आम्ही देशाला न्याय देऊ. आशेचं रूपांतर आता निराशेमध्ये झालं आहे, राहुल बाबाला आता अर्थ नाही, असे म्हणत मंगेश चव्हाण यांनी काँग्रेस आणि राहुल गांधीवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे आणि स्वतःला जाणता राजा पदवी लावून घेणारे शरद पवारांचे दुर्दैव आहे. यांना जनतेसाठी काही करायचं नाही. यांनी राज्याचं आणि देशाचे नुकसान केलं आहे. उद्धव ठाकरेंना त्यांच्या आदूची काळजी आहे. शरद पवारांना सुप्रिया सुळे यांची काळजी आहे आणि नरेंद्र मोदींना जनतेची काळजी आहे, असे म्हणत त्यांनी इंडिया आघाडीवरच हल्लाबोल केला आहे. तर मंगेश चव्हाण यांनी शरद पवारांच्या दीर्घायुष्यासाठी देवाला साकडे घातले आहे. शरद पवारांना माहित आहे त्यांचं वय 82 आहे परमेश्वर त्यांना शंभर वर्ष आयुष्य देवो. नरेंद्र मोदींचे एक दिवसाचे आयुष्य शरद पवारांना जास्त मिळावे. मोदींचा संपूर्ण कार्यकाळ शरद पवारांनी डोळ्यांनी बघितला पाहिजे. या देशाला मोदींनी काय दिलं हे पाहण्यासाठी राजकीय विरोधक शरद पवार जिवंत असले पाहिजे, असे म्हणत मंगेश चव्हाण यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार जोरदार टीका केली आहे…

Published on: Apr 15, 2024 01:16 PM
महाराष्ट्रासह देशातील 11 राज्यांना उन्हाच्या झळा बसणार, हवामान खात्याचा इशारा
चंदा दो धंदा लो, हा खेळ… संजय राऊतांचा श्रीकांत शिंदे यांच्यावर घणाघाती आरोप