हे मूर्ख लोक आहेत भाजपवाले, संजय राऊत यांनी ‘त्या’ टीकेवरून काढली अक्कल

| Updated on: Feb 06, 2024 | 3:46 PM

वंदे भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देण आहे, असे म्हणत भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गट आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत खोचक टीका केली. तर रेल्वे ही देशाची संपत्ती आहे. भाजपवाले मूर्ख आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवासावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली

मुंबई, ६ फेब्रुवारी २०२४ : उद्धव ठाकरे यांनी वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास केला. त्यानंतर भाजपने उद्धव ठाकरे यांच्या वंदे भारतच्या प्रवासावर खोचक टोला लगावला. वंदे भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देण आहे, असे म्हणत भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गट आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत खोचक टीका केली. तर रेल्वे ही देशाची संपत्ती आहे. भाजपवाले मूर्ख आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवासावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजपवरच जोरदार हल्लाबोल केलाय. ‘मोदींनी देशासाठी काय केलं हे जाणून घ्यायचं असेल तर तुझ्या मालक आणि मालकीनने वंदे भारतने चिपळून ते मुंबई असा प्रवास वंदे भारतने केलाय आणि ही मोदींची देण आहे.’, असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. तर नितेश राणे यांनी केलेल्या टीकेवर संजय राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलंय.

Published on: Feb 06, 2024 03:46 PM
‘मातोश्री’चा परिसर पुन्हा चर्चेत, भावनिक साद घालणारे बॅनर्स अन् कुणाचे झळकले फोटो?
आधी हे थांबव… खूप उपकार होतील, छगन भुजबळ यांची हतबल होऊन मनोज जरांगे पाटलांना काय विनंती?