…म्हणून रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली, नितेश राणे यांचा मोठा गौप्यस्फोट

| Updated on: May 22, 2023 | 3:10 PM

VIDEO | 'काळी जादू करून उद्धव ठाकरे यांनी काय केलं आम्हाला माहिती', नितेश राणे यांचा हल्लाबोल

सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे आमदार नितेश राणे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नितेश राणे हे प्रत्येक पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना दिसतात. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असून संजय राऊत सर्वात मोठा जादूटोना करणारा तुझा मालक आहे. काळी जादू करून उद्धव ठाकरे यांनी काय काय केलं हे आम्हाला माहिती आहे. मातोश्रीच्या मागील भागात जेसीबीने खोदून लिंब का टाकलेली याची माहिती द्यावी का?, असं म्हणत त्यांना इशारा दिला आहे. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनणार नाहीत. तर त्यांची पत्नी मुख्यमंत्री बनू शकतात, असं एका बुवाने सांगितलं होतं. म्हणून त्यांनी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली होती. कर्जतच्या फार्महाऊसवर किती नर बळी दिले गेले याची माहिती घ्या, असे म्हणत नितेश राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याचे पाहायला मिळाले. तर अजितदादा पवार यांची डीएनए टेस्ट करण्याची हिंमत संजय राऊत बोलून गेला आहे. पाकिस्तानच्या प्रेमात असलेल्या संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या टोळीला आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला मान कधी हजम होणार नाही, असे म्हणत त्यांनी खोचक टोला लगावल्याचेही पाहायला मिळाले,

Published on: May 22, 2023 03:08 PM
2 हजारांच्या नोटा बाद अन् नोट प्रेसच्या कर्मचाऱ्यांवर भार; कारण…
“मोदींनी फक्त दिवास्वप्न पाहिलं”, पण…; काँग्रेस नेत्याची खरमरीत टीका