तुमच्या बंगल्यावर कोणती नटी येऊन राहायची हे…, नितेश राणेंचा राऊतांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल

| Updated on: Jun 25, 2024 | 2:50 PM

कंगना रनौत यांनी महाराष्ट्र सदनमध्ये जाऊन राहण्यासाठी विचारपूस केली. त्यांना प्रशासनाने नाही म्हटलं. त्या निघून गेल्या. यावर संजय राऊतला मिरच्या झोंबल्या. त्या निवडून गेलेल्या खासदार आहेत, कंगना रनौत या बॅकडोअर एन्ट्री घेतलेल्या खासदार नाहीत, नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली

कंगना रनौत या बॅकडोअर एन्ट्री घेतलेल्या खासदार नाहीत, भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे तर कंगना रनौत यांनी महाराष्ट्र सदनमध्ये जाऊन राहण्यासाठी विचारपूस केली. त्यांना प्रशासनाने नाही म्हटलं. त्या निघून गेल्या. यावर संजय राऊतला मिरच्या झोंबल्या. त्या निवडून गेलेल्या खासदार आहेत, असं नितेश राणे म्हणाले. दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना नितेश राणे असेही म्हणाले, “उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वर्षा बंगल्यावर सचिन वाझे हा किती दिवस राहायचा? त्याच उत्तर कधी देणार?” तर संजय राऊत हे महाशय ज्या दिल्लीच्या निवासस्थानी राहतात, तिथे बॉलीवूडची कोणती नटी येऊन राहायची याची पण माहिती द्यायची का?, असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांना फटकारलं आहे.

Published on: Jun 25, 2024 02:50 PM
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वरून लवकरच करता येणार प्रवास, कधी होणार खुला?
ऐसा नही करना है…. लोकसभा अध्यक्षांनी आष्टीकरांना पुन्हा शपथ घ्यायला लावली, पण का?