‘या’ दिवशी ‘मविआ’ची शेवटची सभा होणार, भाजप नेत्यानं थेट तारीखच सांगितली
VIDEO | महाविकास आघाडीची शेवटची सभा कधी होणार? भाजप नेत्यानं नेमका काय केला दावा?
मुंबई : राज्यातील शिंदे सरकारचं भाजपला ओझं झालं आहे. हे ओझं किती काळ घेऊन फिरायचं असं त्यांना वाटत आहे. त्याबाबतच्या चर्चा मी ऐकू आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. संजय राऊत आणि पत्रकार परिषद घेऊन शिंदे आणि फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान या आरोपांवर प्रत्युत्तर देत भाजप नेते नितेश राणे यांनीही पत्रकार परिषदे घेऊन संजय राऊतांवर पलटवार केला. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासह सगळी लोकं आहेत त्यांचं ओझं झालंय म्हणे… भाजपवर शिवसेना आणि एकनाथ शिंदेंचा ओझर झाले असे ते म्हणतात, पण उद्धव ठाकरेंचं ओझं आता महाविकास आघाडीवर झालंय. १ मे रोजी होणारी मविआची सभा ही शेवटची सभा असणार आहे. म्हणजे यापुढे महाविकास आघाडीची शेवटची सभा असेल यापुढे वज्रमूठ सभा होणार नाही. यावर संजय राऊतांनी स्पष्टीकरण द्यावं असं नितेश राणे म्हणाले. हे म्हणत असताना नितेश राणे यांनी थेट महाविकास आघाडीच्या शेवटच्या वज्रमूठ सभेची तारीखच सांगितली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.