‘उद्धव ठाकरे हा नमकहराम माणूस, याच्यापेक्षा नमकहराम कोणी नाही’, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
VIDEO | ‘मग मी मानतो तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आहात’, उद्धव ठाकरे यांना भाजपच्या नेत्यानं नेमकं काय दिलं चॅलेंज?
मुंबई, ७ ऑगस्ट २०२३ | मुंबईतील रंगशारदा येथे शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मेळावा काल आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व आणि घराणेशाहीवरून टीका करणाऱ्या भाजपवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी औरंग्याच्या मुद्द्यावरुन त्यांनी भाजपवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देत भाजप आमदार नितेश राणे उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. “उद्धव ठाकरे आणि त्यांची टोळी औरंग्याच्या विचारसरणीची आहे. उद्धव ठाकरे हा नमकहराम माणूस आहे. जो स्वत:च्या वडिलांचा, धर्माचा, सख्ख्या भावाचा झाला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 दरम्यान उद्धव ठाकरे यांचे सख्ख्या भावापेक्षा पण जास्त लाड पुरवले. त्यांना उद्धव ठाकरे नाव ठेवत असेल, तर याच्यापेक्षा नमकहराम कोणी होऊ शकत नाही” असं नितेश राणे म्हणाले. तर राहुल गांधींना शिवतीर्थावर आणून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करायला लावा, मग मी मानतो तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आहात, असे म्हणत चॅलेंजही त्यांनी दिलं.