‘संजय राऊत यांनी बॅग भरावी, पुन्हा जेलमध्ये जायची वेळ आलीय’, कुणी फटकारलं?

| Updated on: May 12, 2023 | 3:37 PM

VIDEO | लवकरच पत्राचाळ चाळीचे आरोप निश्चित होणार, पुन्हा जेलमध्ये जायची वेळ येणार, कुणी केला संजय राऊत यांच्याबद्दल दावा

सिंधुदुर्ग : शिंदे-फडणवीस सरकार हे बेकायदेशीर सरकार आहे, तीन महिने फक्त हे सरकार राहणार आहे, असा दावा ठाकरे गटाते खासदार संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत फार घाबरलेला माणूस आहे. हातभर फाटल्यावर चेहरा कसा होतो. तसा कालपासून झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकार अजून भक्कम झालं आहे, असे म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना खोचक टोलाही लगावला आहे. पुढे नितेश राणे म्हणाले, अब तेरा क्या होगा संजय राऊत? जेलमध्ये जाण्याचे दिवस पुन्हा येणार जेलमध्ये असताना बाथरूमसाठी अन्य कैद्यांबरोबर भांडायचा. इतर कैद्यांनी जेलरकडे तक्रार केली होती. हा असा माणून कसा चांगलं वक्तव्य करू शकतो, आता राज्य सरकार मजबूत झालंय तर केंद्र सरकार चांगलं काम करतंय. पत्राचाळ मधल्या मराठी माणसाचा शाप संजय राऊत तुला लागणार, संजय राऊत यांनी बॅग भरावी, पुन्हा जेलमध्ये जायची वेळ आली, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

Published on: May 12, 2023 03:37 PM
अजित पवार यांनी फटकारल्यावर अंधारे म्हणाल्या, ते एकटेच विरोधी पक्षनेते…
बावनकुळे यांच्या टीकेवर अंधारे यांचा घणाघात, म्हणाल्या त्यांना बाजूला करण्यासाठीच फडणवीस यांनी…