रवींद्र वायकर यांच्या प्रवेशावरून नितेश राणे यांची जिव्हारी लागणारी टीका, उद्धव ठाकरे युज अँड थ्रो…

| Updated on: Mar 11, 2024 | 4:36 PM

रवींद्र वायकर हे एकनिष्ठ आमदारांपैकी एक आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे रवींद्र वायकर यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. रवींद्र वायकर यांच्या प्रवेशावरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे

मुंबई, ११ मार्च २०२४ : मुंबईतील जोगेश्वरी येथील ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर हे एकनिष्ठ आमदारांपैकी एक आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे रवींद्र वायकर यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. रवींद्र वायकर यांच्या प्रवेशावरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरे हे युज अँड थ्रो पॉलिसी वापरतात. एखाद्याला वापरायचे आणि सोडून द्यायचे यामुळे निष्ठावंत शिवसैनिक तुम्हाला सोडून जातात हे तुम्हाला कधी कळणार?’, असे वक्तव्य करत नितेश राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. पुढे ते असेही म्हणाले की, रवींद्र वायकर जेव्हा स्वतः अडचणीत आले आणि उद्धव ठाकरेंकडे गेले तेव्हा त्यांना काय उत्तर देण्यात आले… जे उत्तर सरनाईक आणि यशवंत जाधव यांना दिले तेच उत्तर वायकर यांना दिले. तुम्ही तुमचे बघून घ्या आम्हाला यात टाकू नका. आता कुठलाही स्वाभिमान असलेला शिवसैनिक ज्याला हे कळतं जेवढी ताकद उद्धवजी स्वतःच्या मुलाला दिशा सालीयन केसमध्ये वाचवण्यासाठी लावतात, आपल्या मेव्हण्याला वाचवण्यासाठी लावतात तेवढी ताकद ते शिवसैनिकाना वाचवण्यासाठी वापरत नाहीत. याची जाणीव आणि अनुभव त्यांना असल्यामुळे रवींद्र वायकर यांनी आपल्या भवितव्यासाठी आपल्या मतदारांसाठी योग्य तो निर्णय घेतला असल्याचे राणेंनी म्हटले.

Published on: Mar 11, 2024 04:36 PM
‘गधों की काउंटिंग कोई नहीं करता, मैदान में…’, नवनीत राणा यांचा विरोधकांना टोला
अजितदादा एकटे पडणार? राज्याच्या राजकारणात पुन्हा भूंकप होणार, कुणी केला मोठा दावा?