मुंब्य्रातील जितुद्दीनने गरळ ओकली, तीच हिंमत… नितेश राणे यांचा हल्लाबोल काय?
राम शाहकारी नव्हते, मांसाहारी होते, असं वादग्रस्त वक्तव्य शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. यानंतर राजकीय वर्तुळातून आव्हाड यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. अशातच आता भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल
सिंधुदुर्ग, ४ जानेवारी २०२४ : राम शाहकारी नव्हते, मांसाहारी होते, असं वादग्रस्त वक्तव्य शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. यानंतर राजकीय वर्तुळातून आव्हाड यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. अशातच आता भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. मुंब्य्रातील जितुद्दीनने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. तर प्रभू रामानं वनवासात मांसाहार केल्याचे पुरावे द्या, असे म्हणत नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांना आव्हान दिलं आहे. ‘आपल्या देशात हिंदू देवतेचे अपमान करण्याची स्पर्धा काँग्रेसमध्ये सुरू आहे. रामाने 14 वर्षे कंदमुळे खाऊन वनवासात राहिले असे पुरावे आहेत. मांसाहारी खाल्लं असा पुरावा द्यावा. जर पुरावा नसेल तर धर्मांतर करावं आणि मुंब्रा येथे कायम स्वरूपी राहावं. तर जी हिम्मत रामायणाबाबत करतात तीच हिम्मत कुराणाबाबत बोलण्याची कराल का? असा सवालही नितेश राणेंनी केलाय.’ तर नितेश राणे वाचतात किती, बोलतात किती हे महाराष्ट्राला माहिती आहे, असे म्हणत नितेश राणे यांच्या आव्हानाला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.