पुणे अपघातावर सुप्रिया सुळेंचं मौन का? अग्रवाल कुटुंबाशी संबंध असल्याचा भाजप नेत्याचा आरोप
पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कल्याणी नगर येथे हिट अँड रन प्रकरणावरून भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे ताई गप्प का आहेत? शरद पवार गटातून याबद्दल काहीच प्रतिक्रिया का व्यक्त होत नाही ?
पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कल्याणी नगर येथे हिट अँड रनचा जो प्रकार घडला, त्यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच रंगलं आहे. अशातच पुण्यातील अपघाताच्या या प्रकरणावरून भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील अपघात प्रकरणावर नितेश राणेंनी सुप्रिया सुळेंवर प्रश्नांची सरबत्ती करत जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळत आहे. नितेश राणे म्हणाले, ‘नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे ताई गप्प का आहेत? शरद पवार गटातून याबद्दल काहीच प्रतिक्रिया का व्यक्त होत नाही ? प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे या पुण्याच्या घटनेवर मात्र गप्प का? सुप्रिया सुळे यांचा या घटनेतील कुटुंबाशी संबंध होते का? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? कारण आरोपीला जो वकील देण्यात आला आहे, तो पवार साहेबांच्या अतिशय निकटवर्तीय असल्याचे कळतंय’, असं वक्तव्य करत नितेश राणेंनी गंभीर आरोप केला आहे.