‘माझ्या नादी लागू नका… तुम्हाला पश्चताप होईल’, जरांगे पाटलांचा भाजपच्या बड्या नेत्याला इशारा
भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या टीकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी हा थेट इशारा दिला आहे. नारायण राणे यांच्यावर बोलाल तर जीभ जागेवर ठेवायची की नाही ते बघू, असं वक्तव्य नितेश राणे यांनी करत मनोज जरांगे पाटील यांना सूचक इशारा दिला होता. यावर मनोज जरांगे पाटील यांचा पटलवार काय?
गेल्या काही दिवसांपासून भाजप, सरकारमधील काही नेते आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. अशातच माझ्या नादी लागू नका नाहीतर तुम्हाला पश्चताप होईल, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या टीकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी हा थेट इशारा दिला आहे. नारायण राणे यांच्यावर बोलाल तर जीभ जागेवर ठेवायची की नाही ते बघू, असं वक्तव्य नितेश राणे यांनी करत मनोज जरांगे पाटील यांना सूचक इशारा दिला होता. ‘मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला. भारतीय नेत्यांना, सत्ताधाऱ्यांना जाब विचारला तसं कधीच नाना पटोले, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना जाब विचारला नाही. मनोज जरांगे हा तुतारीचा माणूस आहे. राज्यात तुतारी वाजवत फिर… आता हे जगाला कळलं आहे. रात्री तुतारी वाजवायची आणि सकाळी भाजपवर टीका करायची’, अशी टीका नितेश राणे यांनी केली होती. तर यावर मनोज जरांगे पाटलांचा पलटवार काय?