राहुरीत हिंदू जनआक्रोश मोर्चा, नितेश राणे यांचा एल्गार; धर्मांतर, लव्ह जिहाद मुद्द्यांवरुन आक्रमक
VIDEO | अहमदनगरच्या राहुरीमध्ये नितेश राणे यांचा एल्गार...हिंदू जनआक्रोश मोर्च्यातून धर्मांतर, लव्ह जिहाद मुद्द्यांवरुन भाजप आमदार आक्रमक
अहमदनगर, 5 ऑगस्ट 2023 | सकल हिंदू समाजाच्या वतीने आज अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे आमदार नितेश राणे देखील या हिंदू जन आक्रोश मोर्च्यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. उंबरे गावातील लव्ह जिहादच्या प्रकरणी हा मोर्चा काढण्यात आला. भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात राहुरीत जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी वाय एम सी मैदानावर भगवं वादळ तयार झाल्याचं दिसून आलं. दरम्यान, राहुरी शहराबरोबर राहुरी तालुका कडकडीत बंद ठेवत नागरिक मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.वाय एम सी मैदानावर भगवं वादळ आल्याचे चित्र आज राहुरीमध्ये होते. यावेळी अहमदनगरच्या राहुरीमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांचा एल्गार पाहायला मिळाला. नितेश राणे यांनी हिंदू जनआक्रोश मोर्च्यातून धर्मांतर, लव्ह जिहाद मुद्द्यांवर भाष्य करताना ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.