राज्यातील भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, कोणी केली अर्वाच्च भाषेत शिवीगाळ?
प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी मिळाल्यानंतर या प्रकरणी प्रसाद लाड यांनी पोलिसात धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांच्या जीवाला धोका असल्याचे समोर आले आहे. कारण प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी मिळाल्यानंतर या प्रकरणी प्रसाद लाड यांनी पोलिसात धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीविरोधात प्रसाद लाड यांनी पोलिसांत धमकी मिळाल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. इतकंच नाहीतर या मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन तसेच त्याची कसून चौकशी करावी, अशी मागणी प्रसाद लाड यांनी पोलिसांकडे केली आहे. माहितीनुसार मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीकडून आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ देखील करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दोन हजार लोकांसह तुझ्यावर हल्ला करेनं असं प्रसाद लाड यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीने म्हटलं आहे. तसेच प्रसाद लाड यांना धमकी देणारा व्यक्ती कधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचा दावा करतो तर कधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचा दावा करतो. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.