तू काय ठेका घेतलाय का? हिम्मत असेल तर…, ‘त्या’ गंभीर आरोपांवर भाजप नेत्याचं जरांगेंना आव्हान
मराठ्यांविरोधात असलेल्या नेत्याना पाडणार असा इशारासुद्धा जरांगे पाटलांनी दिला आहे. यावर आता भाजपकडून उत्तर देण्यात आलंय. 'तू काय ठेका घेतलाय का? कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं... एवढीच हिम्मत असेल तर...'. काय म्हणाले, भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड बघा?
आपल्याला तुरुंगात टाकून मारायचा प्लॅन भाजपचा असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. तसंच मराठ्यांविरोधात असलेल्या नेत्याना पाडणार असा इशारासुद्धा जरांगे पाटलांनी दिला आहे. यावर आता भाजपकडून उत्तर देण्यात आलंय. ‘तू काय ठेका घेतलाय का? कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं… एवढीच हिम्मत असेल तर राजकारणात यावं निवडणूक लढवावी आणि आपले २८८ आमदार उभे करावे’, असं आव्हानच प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलंय. यासह लाड असेही म्हणाले, लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केलेत, असं वक्तव्य भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलंय. मी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावरच बोलत नाहीतर उद्धव ठाकरे यांच्यावरही बोलतो, हे केवळ जनतेचं लक्ष विचलित करण्याचं काम आहे. तर लोकांचे खाल्लेले पैसे परत द्या, ते तक्रार मागे घेतील असेही प्रसाद लाड म्हणाले.