फडणवीसांवर टीका, जरांगे म्हणाले… प्रविण दरेकर यांचं प्रत्युत्तर अन् कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल
प्रविण दरेकर यांना शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे रमेश पाटील यांनी दरेकरांना शिवीगाळ केली आहे. रमेश पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर TV 9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
मुंबई, २९ फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षासंदर्भातील आंदोलनाने वेगळंच वळण घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण देऊनही मनोज जरांगे पाटील नाराज आहे. तर त्यांनी सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत गंभीर आरोप केलेत. या आरोपानंतर भाजप नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना अटक केली जावी आणि त्यांची नार्को एनालिस टेस्ट करावी अशी मागणी केली. दरम्यान, प्रविण दरेकर यांना शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे रमेश पाटील यांनी दरेकरांना शिवीगाळ केल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान रमेश पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून रमेश पाटील यांनी गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, जरांगे पाटलांवर टीका केल्याने दरेकरांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर TV 9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.