विधानपरिषदेच्या निवडणुकीत कोणाचा ‘गेम’ होणार? नार्वेकरांमुळे कुणाची विकेट? दरेकरांनी स्पष्टच सांगितलं…
विधानपरिषद निवडणुकीत 11 जागा आहेत आणि 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे फोडाफोडी होणार हे निश्चित आहे. तर ठाकरेंच्या मिलिंद नार्वेकरांमुळे महाविकास आघाडीतीलच एकाच विकेट जाणार आहे, असा दावाच भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी केला आहे. बघा नेमकं काय म्हणाले?
विधानपरिषदेच्या मतांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मतांची जुळवा-जुळव सुरू केली आहे. विधानपरिषद निवडणुकीत 11 जागा आहेत आणि 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे फोडाफोडी होणार हे निश्चित आहे. तर ठाकरेंच्या मिलिंद नार्वेकरांमुळे महाविकास आघाडीतीलच एकाच विकेट जाणार आहे, असा दावाच भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी केला आहे. दरेकरांच्या म्हणण्यानुसार, मिलिंद नार्वेकर हे जिंकतील पण महाविकास आघाडीतील दोन पैकी एकाची विकेट जाईल. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत. ठाकरेंनी त्यांना विधानपरिषदेसाठी तिकीट दिलं. पण मतांचं समीकरण आणि गुप्त मतदाामुळे क्रॉस वोटिंगची शक्यता नाकारता येत नाही. दोन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचीच ९ मतं फुटली होती. आता दरेकरांच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडीची एक विकेट जाईल, त्यामुळे नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.