भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं वयाच्या ५९ व्या वर्षी निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

| Updated on: Feb 23, 2024 | 2:13 PM

गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र पाटणी हे आजारी होते आणि या दीर्घ आजारामुळेच त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळतेय. राजेंद्र पाटणी हे कारंजा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत होते. आमदार राजेंद्र पाटणी यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली

मुंबई, २३ फेब्रुवारी २०२४ : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज दुखःद निधन झाल्याची बातमी ताजी असताना त्यातच भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. आमदार राजेंद्र पाटणी यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र पाटणी हे आजारी होते आणि या दीर्घ आजारामुळेच त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळतेय. राजेंद्र पाटणी हे कारंजा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत होते. आमदार राजेंद्र पाटणी यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचं वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झाले आहे. शिवसेनेचे नेते मनोहर जोशी आणि भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधनाच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राजेंद्र पाटणी हे एकेकाळी शिवसैनिक होते २०१४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.

Published on: Feb 23, 2024 02:12 PM
मोदींचा फोटो लावून जिंकायचे पण आता कळेल….देवेंद्र फडणवीस याचं उद्धव ठाकरे यांना आव्हान
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; अमित ठाकरे यांच्या नेतृत्वातील मोर्च्याच्या मागण्या काय?