आज तुमचा सामना अन् संजय राऊत गप्प का? आव्हाड यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजप नेत्याचा थेट सवाल
जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाबद्दल जे सांगितलं की राम मांसाहार करायचे हे धादांत खोटं आहे. हिंदूचा अपमान केला आहे. त्यात ठराविक संप्रदायाने कसं खुश करता येईल याचं उत्तम उदाहरण ते देत आहेत, असं वक्तव्य भाजप आमदार राम कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या 'त्या' वक्तव्यावर केलंय.
मुंबई, ४ जानेवारी २०२४ : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांबद्दल वक्तव्य केलं आणि राज्यभरात विविध ठिकाणी पडसाद उमटत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाबद्दल जे सांगितलं की राम मांसाहार करायचे हे धादांत खोटं आहे. हिंदूचा अपमान केला आहे. त्यात ठराविक संप्रदायाने कसं खुश करता येईल याचं उत्तम उदाहरण ते देत आहेत, असं वक्तव्य भाजप आमदार राम कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर केलंय. तर राम मासांहार करायचे याचा आव्हाडांनी पुरावा द्यावा असेही त्यांनी म्हटलंय. यासंदर्भात राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी राम कदम यांनी सवाल करत म्हटलं की, आज तुमचा सामना, प्रवक्ते गप्प का? जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल जाब का नाही विचारत? जितेंद्र आव्हाड यांना शिक्षा झाली पाहिजे. आज घाटकोपरमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात FIR दाखल करण्यासाठी आल्याची माहिती देत पोलिसांना आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करून घ्यावा लागेल असेही त्यांनी म्हटले.