Ladki Bahin Yojana : ठाकरे गट अन् काँग्रेसच्या लोकांनी ‘लाडकी बहीण योजने’चे चुकीचे फॉर्म…; राम कदमांचा गंभीर आरोप काय?
'घाटकोपरमध्ये एका घरी तीन बहिणी आहेत. त्यांना महिन्याला साडे सात हजार रुपये मिळणार आहेत. पण तुमचे कार्यकर्ते तिथे जाऊन चुकीचा फॉर्म भरत आहेत, असं राम कदम यांनी सभागृहात म्हटलं. तर उबाठा आणि शरद पवार गटही चुकीचा फॉर्म भरत आहेत.', सभागृहात भाजप आमदार आक्रमक झाले
पावसाळी अधिवेशनात भाजपचे नेते राम कदम यांनी लाडकी बहीण योजनेत काँग्रेसचे लोक चुकीचा फॉर्म भरून देत असल्याचा आरोप केला. राम कदम यावेळी म्हणाले, घाटकोपरमध्ये एका घरी तीन बहिणी आहेत. त्यांना महिन्याला साडे सात हजार रुपये मिळणार आहेत. पण तुमचे कार्यकर्ते तिथे जाऊन चुकीचा फॉर्म भरत आहेत, असं राम कदम यांनी सभागृहात म्हटलं. तर उबाठा आणि शरद पवार गटही चुकीचा फॉर्म भरत आहेत. १५ ऑगस्ट रोजी त्या बहिणीच्या खात्यात पैसे जाऊ नये आणि तसं झाल्यास तुम्हाला सत्ताधारी पक्षाविषयी बोंबलत बसायचं आहे, यासाठी चुकीचा फॉर्म भरत आहेत. गोरगरीब बहिणीला पैसे मिळत असतील तर तुम्हाला काय अडचण आहे? तुम्हाला चांगल्या योजनांमध्ये राजकारण करायचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना फसली पाहिजे असा तुमचा दुर्दैवी प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप राम कदम यांनी केला आहे.
Published on: Jul 12, 2024 03:24 PM