बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक दुसऱ्याची चेले-चपाटीगिरी करत नाही, राऊतांवर कुणाचा हल्लाबोल?

| Updated on: Dec 12, 2023 | 10:54 PM

संजय राऊत म्हणजे गावाकडचा भाकरीवरचा तमाशा असतो तशाप्रकारचे आहेत. सुपारी घ्यायची अन् कुणाच्या दारात नाचायचं, कुणावर टीका करावी याच कामासाठी संजय राऊत राहिले आहेत. असे म्हणत भाजप आमदार राम शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

नागपूर, १२ डिसेंबर २०२३ : संजय राऊत म्हणजे गावाकडचा भाकरीवरचा तमाशा असतो तशाप्रकारचे आहेत. सुपारी घ्यायची अन् कुणाच्या दारात नाचायचं, कुणावर टीका करावी याच कामासाठी संजय राऊत राहिले आहेत. असे म्हणत भाजप आमदार राम शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. त्यमुळे ज्याचं खातो त्याचंच गायला पाहिजे. तर ज्याचं खायचं त्याच्या दारात नाचायला पाहिजे, असे म्हणत राम शिंदे यांनी संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे. अशा प्रकारच्या संजय राऊत यांच्या वर्तणाने परिस्थिती खालावत चालली आहे. देशाची, राज्याची जी संस्कृती आहे त्या पातळीचं वक्तव्य केले पाहिजे. तर बाळासाहेबांचा शिवसैनिक तर शरद पवार यांचा चेला असल्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला यावर बोलताना राम शिंदे म्हणले, बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक दुसऱ्याची चेले-चपाटीगिरी करत नाही.

Published on: Dec 12, 2023 10:54 PM
तो माझा मेव्हणा नाही… माझ्या बँकेवर डंके की चोट पे म्हणत गुणरत्न सदावर्ते भडकले
‘लालपरी’ला भोलेनाथ पावला, महाशिवपुराण कार्यक्रमामुळे ST ची बक्कळ कमाई, ७ दिवसांत कमावले…