असं काय घडलं? मंचावर बसलेल्या भाजप आमदाराला थेट मंचावरुन खाली उतरायला सांगितलं!
VIDEO | मंचावर बसलेल्या भाजप आमदाराला थेट मंचावरुन खाली उतरायला सांगितलं, नेमकं काय घडलं? कुठं दिली आमदाराला अपमानास्पद वागणूक
यवतमाळ : जनसुनावणीत जिल्हाधिकाऱ्यांसोबत मंचावर बसलेल्या भाजप आमदाराला मंचावरुन खाली उतरायला सांगितलं असल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकारी यांच्यासोबत मंचावर बसलेल्या आमदार संजीव रेड्डी बोतकुलवार हे सुद्धा बसलेलेल होते. मात्र त्यांनाही खाली उतरण्यास सांगितलं. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील मांगली कोळसाखान जनसुनावणीच्या वेळेस घडली. कोळसाखान जनसुनावणीच्या वेळेस मंचावर बसलेल्या यवतमाळ वणीच्या भाजप आमदारावर हा रोष पाहायला मिळलं. जनसुनावणीच्या वेळेस सामाजिक कार्यकर्त्यांच्या रोषानंतर आमदार संजिव रेड्डी बोतकुलवार यांना मंचावरुन खाली उतरायला सांगितलेल्या प्रकारानंतर ते जनतेत येऊन बसले. मांगली कोळसाखान प्रकल्प जन सुनावणीत आमदारांचा हस्तक्षेपामुळे समाजसेवक वासुदेव विधाते यांनी हा रोष व्यक्त केला. तर जिल्हाधिकारी यांच्यासोबत मंचावर बसलेल्या आमदार संजीव रेड्डी बोतकुलवार यांना मंच सोडायला सांगितलं. यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केल्यानंतर बोतकुलवार जनतेसह बसल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, मंचावरुन आमदार बोतकुलवार खाली जानातानाचा सध्या सोशल मिडीया चांगलाच व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.